Ram Gomare, PSI, MH State Govt

Last modified by Vishal E on 2019/01/11 13:30

Ram Gomare, PSI, MH State Govt.

WhatsApp Image 2018-09-24 at 9.09.48 PM.jpeg

The Show must go on....

व्यक्तिमत्व

श्री राम गोमारे हे एक अत्यंत शांत व सयंमी व्यक्तिमत्व. मातीतली माणसं पाय जमिनीवर ठेऊन आभाळाएवढी उंची का गाठतात याचे उत्तर रामच्या व्यक्तिमत्वात सापडते. आयुष्यात पुस्तकातुन जसे खुप काही शिकायला मिळते तसेच माणसांकडुनही. आभाळाएवढी उंची गाठलेला हा माणूस अतिशय साधारण परिस्थितीतुन पुढं आला.शेतकरी कुटुंबातील माझा जन्म. घरामध्ये कुठलीही शैक्षणिक पार्श्वभूमी नव्हती. भविष्यात केवळ शिक्षण हीच आपली संपत्ती असेल, ह्या संकल्पनेतून शिक्षण घेऊन नोकरी करावी असे लहानपणापासून वाटायचे. 

शिक्षण

शालेय शिक्षण 1 ते 10 पर्यंत दयानंद विद्यालय, बाभळगाव येथे झाले,10 वी ची परीक्षा झाल्यास लातूर येथील एका भांड्याच्या दुकानात 800 रु पगाराची नोकरी केली. रविवारी साप्ताहिक सुट्टी रहायची पण त्या दिवशी ड्यूटी केली तर वेगळे 50 रुपये मिळायचे त्यामुळे रविवारची सुट्टी न घेता येणाऱ्या रविवारची वाट आवर्जून वाट पाहायची.त्यानंतर पुढील शिक्षणासाठी लातूर ला जावे ही मनोमन इच्छा असतानाही ते शक्य झाले नाही, त्यामुळे गावातच 11 वी कॉमर्स ला अॅडमिशन घेतले. दरम्यान मुदतीत श्री.धायगुडे सर (बसवेश्वर महाविद्यालय लातूर ) यांची ओळख झाली, सरांनी माझ्या 10 वी च्या गुणांचा कसलाही विचार न करता माझी इच्छाशक्ति ओळखून मला बसवेश्वर महाविद्यालय लातूर येथे 12 वी आर्ट्स शाखेत प्रवेश घेण्या साठी आग्रह धरला, तेंव्हा माझे  एक मन लातूर येथे शिक्षणासाठी जाण्यास आग्रही होते तर दूसरे मन 11 वी ला कॉमर्स शाखा बदलून इथले सर्व जुने मित्र सोडून लातूरला जाण्यास तयार नव्हते, तरीही आई वडिलांशी चर्चा करून लातूरला जाण्याचे निश्चित केले. त्याप्रमाणे लातूर येथील बसवेश्वर महाविद्यालय येथे 12 वी आर्ट्स ला प्रवेश घेतला, तत्पूर्वी गावात 12 वी कॉमर्स चे व्याखेशनही झाले होते त्यामुळे माझ्या समोर खूप मोठे आव्हान उभे होते. 12 आर्ट्स ला फक्त हिंदी व इंग्रजी हे दोनच विषय परिचयाचे होते बाकी चार विषय अनोळखी होते, बोर्डाची परीक्षा तर अवघ्या सहा महिन्यावर आली होती, तरीही जिद्द न सोडता धायगुडे सरांच्या मार्गदर्शनाखाली आभ्यास केला व 12 वी ची परीक्षा दिली.आर्थिक चणचण असल्याने 12 वी ची परीक्षा झाल्यास लातूर येथील एका सुपर मार्केट मधे 1200 रु पगाराची नोकरी केली तसेच सोबत एका सिगारेट कम्पनीचे शहरात सायकल वर फिरुन मार्केटिंग केले. दररोज साधारण 30 कि.मी. पर्यंतचा सायकलचा प्रवास व्हायचा. स्वप्नांच्या धुंदीत सायकलचे किती पायंडल मारले हे कळायचेच नाही आणी घरी येऊन एकदा आंथूरनात पडले की सकाळ कधी झाली हे कळायचे नाही. एकदाचा 12 वी चा निकाल लागला,  77.33% मार्क मिळाले आणी वडिलांनी गावात पाच किलो पेढे वाटले.सर्व काही ठीक चालू होत पण ते म्हणतात ना नियतीला काही वेगळच मान्य होत अचानक डिसेंबर 2006 ला वडीलांच निधन झालं आणि जणु कुटुंबावर आभाळ कोसळलं. काय कराव काहीच सुचत नव्हत आधीच परीस्थिती बेताची व त्यात कर्ता मानूस नसल्यामुळे शिक्षण सोडून घरी हातभार लावण्याशिवाय पर्याय दिसत नव्हता. पण म्हणतात ना ईच्छा असेल तर मार्ग नक्कीच सापडतो. सहसा पालकत्व हे आपल्यापेक्षा वयाने मोठे असणारे स्विकारतात पण माझ्या बाबतीत ती जबाबदारी लहान भाऊ प्रविण याने स्विकारली व शिक्षण घेत दुपारच्या वेळेत गावातील पानमसाला दुकानात काम करून घरखर्च भागवून त्याने मला तू पुढील शिक्षण घे बाकी गोष्टी मी बगतो असे सांगून खूप मोठा आधार दिला.आर्थिक परिस्थिती लक्षात घेता झटपट शिक्षण पूर्ण करुन नोकरी करणे हाच पर्याय होता. D ed हा एक ऊत्तम पर्याय उपलब्ध होता आणि म्हणून चाकूरला संगय्या स्वामी अद्यापक विद्यालयात 2006 साली प्रवेश घेतला. डी एड पूर्ण करण्यासाठी मामांनी खूप मोठी मदत केली. त्यानंतर  D ed  पुर्ण झाले मग मुक्त विद्यापीठातून 2012 साली बी ए पास झालो. त्यामध्येच शिक्षक भरती परीक्षा दिली पण अभ्यास करुनही त्यात थोड्या गुणांनी  अपयश आले. मग पुढे काही सुचत नव्हते पण हार मानून चालणार नव्हत. पोलीस वसाहत व प्रशिक्षण केंद्र घरापासुन जवळ असल्यामूळे पोलीस ड्यूटी बदल आदर व आकर्षण होतेच मग काय लागलो भरतीच्या तयारीला व सोबतच घरखर्च भागविण्यासाठी शाळेतील मुलांची शिकवणी घेऊ लागलो. माझा गणित व बूदधीमत्ता हे विषय हॅण्ड असल्यामुळे पोलीस भरती तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचे क्लास चालू केले क्लास ला 12 विद्यार्थी होते त्यांच्यासोबत मी ही भरतीची तयारी चालू केली.शिक्षक भरती मधील अपयशानंतर स्पर्धा परीक्षेची तयारी सुरूच होती. आर्थिक परीस्थिती हालाखीची असल्यामूळे लवकर नोकरी मिळाणे गरजेचे होते म्हणून 2011 साली लातूर जिल्हानिवड समीती कडे घेतल्या जाणाऱ्या परीचर (चतुर्थश्रेणी) ही परीक्षा दिली व तेथेही एका गुणांने अपयश आले. 2011 त्याच वर्षी पोलीस भरती दिली व आम्हा 12 जनापैकी ८ जन यशस्वी झाले पण त्यात मी नव्हतो. आता मात्र आर्थीक स्थिती सोबत मानसिक स्थिती पण बिघडत चालली होती.मग पूढील वर्षी 2012 ला उस्मानाबाद जिल्ह्यातील भरतीमधे पोलीस शिपाई या पदावर निवड झाली. पण तत्पूर्वी 2012 ला पोलीस उपनिरीक्षक पदाची परीक्षा होती व ती परीक्षा पास झालो होतो. जिव तोडून अभ्यास करत होतो कारण माहिती होत अभि नही तो कभी नही. सोबत आमचे गुरु सोपान पाटोळे (PSI) हे ही तयारी करत होते. त्यांना अगोदर पासून अभ्यास असल्यामूळे मला जास्त वेळ देणे गरजेचे होते. मला आठवते 14 एप्रिल डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीला मी सलग 18 तास अभ्यास केला होता.2011 च्या शेवटी एम पी एस सी द्वारे पोलीस उपनिरीक्षक पदाची जाहिरात आली, त्यावेळी गावातून सोपान पाटोळे हे दोन तीन वर्षापासून स्पर्धा परीक्षेची तयारी करत होते. त्यांना माहीत होते की मी ही स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे त्यामुळे त्यांनी मला बोलाऊन मोलाच मार्गदर्शन केल व सांगितलं की जीव तोडून, रक्ताच पाणी करून अभ्यास कराल तरच स्पर्धा परीक्षेत यशस्वी व्हाल शेवटी तुम्ही ठरवा तुम्हाला काय करायच आहे ते. त्यानंतर एकांतात जाऊन खुप विचार केला व निश्चय केला की आपणाला कुठल्याही परिस्तितित PSI परीक्षा पास व्हायची आहे आणी त्यासाठी मला सोपान गुरुजी पेक्षा जास्त वेळ आभ्यास करने गरजेचे आहे, त्याप्रमाणे आम्ही दोघांनी मिळून तयारी चालू केली. आमच्या दोघात ठरले की गुरुजींनी माझ्याकडून  लेखी परीक्षेची तयारी करून घ्यायची व मी त्यांची शारीरिक परीक्षेची तयारी करून घ्यायची. त्याप्रमाणे एकमेकांना मदत करत आमच्या  तयारीचा प्रवास चालू झाला.मी व सोपान गुरुजींनी मिळून पोटाला चिमटा काढून पुस्तके विकत घेतली, पोट भर कधी जेवण न करता पोटभरुन पुस्तके वाचली, दोघांनी डोळे कधी निवांतपणे झाकलेत असा दिवस आठवत नाही.पंधरा पंधरा तास आमचा अभ्यास चालू झाला, जणू काही आम्हाला अभ्यासाचे वेडच लागून गेले होते. उठता बसता आमचा चर्चेचा विषय एकच फक्त अभ्यास, अभ्यास जणू आमच्या आयुष्याचा अविभाज्य घटक बनला होता.ठरल्याप्रमाणे आम्ही दोघेही पूर्व परीक्षा पास झालो, त्यानंतर पुढचा टप्पा होता तो मुख्य परीक्षेचा. सोपन गुरुजींनी यापूर्वी दोन तीन मुख्य परीक्षा दिल्या होत्या त्यामुळे त्यांना परीक्षेचा अंदाज व चांगला अभ्यास होता, परंतु माझा पहिलाच प्रयत्न असल्याने परीक्षेचा अंदाज नव्हता व तेवढा अभ्यासही नव्हता त्यामुळे मी त्यांच्या सोबत आठ दहा तास अभ्यास करून त्यांच्या माघारी सात आठ तास अभ्यास चालू केला. असा एकुण दिवसाचा अभ्यास पंधरा सोळा तास होत होता. दरम्यान इंग्रजी हा विषय आवघड वाटत होता त्यामुळे श्री.मनोज तावडे सर यांचे मार्गदर्शन घेतले, सरांनी अतिशय सोप्या शब्दात इंग्रजी विषयाचे मार्गदर्शन केले.मी व गुरुजींनी औरंगाबाद येथे मुख्य परीक्षा दिली, परत येत असतानाच प्रश्नपत्रिका चेक केली दोघांनाही चांगले मार्क पढ़त होते त्यामुळे खुशी मधे रात्रभर औरंगाबाद ते लातूर रेल्वेने उभारून प्रवास केला व ठरवले की उदयापासूनच ग्राऊंड ची तयारी करायची.ठरल्याप्रमाणे सकाळी दोन तास व सायंकाळी दोन तास ग्राऊंडची तयारी चालू केली. खूप अडचणी आल्या, पठारअवस्था येऊ लागली तरीही न खचता नियमित सराव चालू ठेवला.
  PSI

.. ©copyrightलेखन: नितीन निटूरे व राम गोमारे

References

  • Written and Edited by Nitin Niture and Ram Gomare PSI
  • WikiNote Foundation
Tags:
Created by Vishal E on 2019/01/11 13:30
    

Tips

Did you know that you can improve XWiki? Take 5 minutes to fill this survey and help this open source project!

Need help?

If you need help with XWiki you can contact: